बंधनापलीकडे एक नाते असावे
शब्दाचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा
दुःखाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रित असावा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
साजरे करु मकर संक्रमण
करून संकटावर मात,
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
घालशील जेव्हा तू काळी साडी,
लाभेल तुला तिळगुळाची गोडी,
माझ्या हातात दे पतंगाची दोरी,
करूया साजरी शुभ मकर संक्रांती.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
मोठे ध्येय ठेऊन मनात,
उडवूया पतंग उंच गगनात,
असे उंच जातील आपले पतंग,
जे देतील जीवनास आनंद तरंग.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
मनात असते आपुलकी
म्हणून स्वर होतो ओला,
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
हलव्याचे दागिने, काळी साडी,
अखंड राहो तुमची जोडी
हीच शुभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तिळाची उब लाभो तुम्हाला
गुळाचा गोडवा येवो जीवनाला,
यशाची पतंग उडो गगना वरती
शुभ मकर संक्रांती तुम्हाला अणि तुमच्या परिवाराला.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्षाच्या नवीन सणाच्या,
गोड मित्रांना मकर संक्रातीच्या,
गोड गोड शुभेच्छा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!