किती त्रास होतो ना त्यावेळी
जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला
आयुष्यभर साथ देण्याचे वचन देवून
आयुष्यभरासाठी निघुन जाते.
एक वेळ अशी होती की
तेव्हा बोलणचं संपत नव्हते,
आणि एक वेळ अशी आहे की
बोलणचं होत नाही.
तू सोडून गेल्यानंतर एक गोष्ट
खूप चांगली समजली मला,
की जाणाऱ्या व्यक्तीला का थांबवतात.
जे धोका देवून गेले
त्यांच्या आठवणीत रडण्यापेक्षा,
जे सोबत आहेत त्यांच्या सोबत
हसत जगायला केव्हा ही चांगले.
तुझ्यात आणि माझ्यात
फक्त थोडाच फरक होता.
तुला वेळ घालवायचा होता
आणि मला आयुष्य.
प्रेम आणि विश्वास
कधी गमावू नका कारण,
प्रेम प्रत्येकावर करता येत नाही
आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही.
आयुष्याच्या या वाटेवर
मी माझी वाट शोधतोय,
वाहणारे अश्रू येतात जिथून
मी तो पाट शोधतोय.