आयुष्याच्या या वाटेवर
मी माझी वाट शोधतोय,
वाहणारे अश्रू येतात जिथून
मी तो पाट शोधतोय.
श्वास थांबल्यानंतर माणूस एकदाच मरतो,
पण जवळच्या व्यक्तीने साथ सोडल्यावर
माणूस रोज रोज मरतो.
काच बनविणाऱ्याने जर हृदयपण
काचेच बनवलं असतं तर फार बरं झालं असतं,
कमीत कमी तोडणाऱ्याच्या
हाताला जखम तरी झाली असती.
एक वेळ अशी होती की
तेव्हा बोलणचं संपत नव्हते,
आणि एक वेळ अशी आहे की
बोलणचं होत नाही.
प्रेम आणि विश्वास
कधी गमावू नका कारण,
प्रेम प्रत्येकावर करता येत नाही
आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही.
जे धोका देवून गेले
त्यांच्या आठवणीत रडण्यापेक्षा,
जे सोबत आहेत त्यांच्या सोबत
हसत जगायला केव्हा ही चांगले.
आयुष्याच्या या वाटेवर
मी माझी वाट शोधतोय,
वाहणारे अश्रू येतात जिथून
मी तो पाट शोधतोय.