ज्या व्यक्तीसोबत आपली
आयुष्यभर राहण्याची इच्छा असते,
त्या व्यक्तीपासून,
दुर जाणे खुप कठीण असते.
जवळीक साधून माझ्याशी
कशी किमया केलीस,
वेड लावून माझ्या मनाला
तू का निघून गेलीस.
शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,
पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी
मनाला जखमी व्हावी लागते.
आजपासून थोडं बदलायचं,
कारण कोणाच्या आयुष्यात
पर्याय म्हणुन नाही राहायचं.
तुला काय फरक पडणार आहे,
मला सोडून जाऊन,
खरं प्रेम तर मी केल होत, तू नाही.
चहा मधे बिस्कीट कधी पडेल,
आणि एखादी व्यक्ती कधी धोका देईल,
काही सांगता येत नाही.
असतात काही माणसं अशी
खोटी नाती जोडणारी,
मनात हक्काच स्थान मिळवून
विश्वासघात करणारी.
Traffic Signal पाहुन मला सुध्दा
काही लोकांची आठवण येते,
कारण ते सुध्दा असेच रंग बदलत होते.
तोडू नयेत दुसऱ्याची मने
झाडाच्या फांदीसारखी,
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात,
पण मने मात्र कायमची तुटतात.