चहा मधे बिस्कीट कधी पडेल,
आणि एखादी व्यक्ती कधी धोका देईल,
काही सांगता येत नाही.
तुला काय फरक पडणार आहे,
मला सोडून जाऊन,
खरं प्रेम तर मी केल होत, तू नाही.
तोडू नयेत दुसऱ्याची मने
झाडाच्या फांदीसारखी,
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात,
पण मने मात्र कायमची तुटतात.
चुक झाल्यावर साथ सोडणारे
खुप असतात पण,
चुक झाल्यावर समजुन घेणारे
फारच कमी असतात.
खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर
आता कुणावर करूच शकत नाही,
खूप स्वप्नं पाहिली होती त्याची,
जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.
असतात काही माणसं अशी
खोटी नाती जोडणारी,
मनात हक्काच स्थान मिळवून
विश्वासघात करणारी.
Offline गेल्यानंतर एकवेळ
Message येणं बंद होईल,
पण एखाद्याची आठवण येणं
कधीच बंद होत नाही.
तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले
प्रेम कशाला म्हणतात,
आणि सोडून गेली तेव्हा समजले
खरे प्रेम कशाला म्हणतात.
जवळीक साधून माझ्याशी
कशी किमया केलीस,
वेड लावून माझ्या मनाला
तू का निघून गेलीस.
ज्या व्यक्तीसोबत आपली
आयुष्यभर राहण्याची इच्छा असते,
त्या व्यक्तीपासून,
दुर जाणे खुप कठीण असते.