गळून गेलेल्या पाकळ्या
जशा पुन्हा जुळत नाही,
तसेच मनातून उतरलेले काहीजण
पुन्हा मनात भरत नाहीत.
तोडू नयेत दुसऱ्याची मने
झाडाच्या फांदीसारखी,
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात,
पण मने मात्र कायमची तुटतात.
चुक झाल्यावर साथ सोडणारे
खुप असतात पण,
चुक झाल्यावर समजुन घेणारे
फारच कमी असतात.
गळून गेलेल्या पाकळ्या
जशा पुन्हा जुळत नाही,
तसेच मनातून उतरलेले काहीजण
पुन्हा मनात भरत नाहीत.
आजपासून थोडं बदलायचं,
कारण कोणाच्या आयुष्यात
पर्याय म्हणुन नाही राहायचं.
ज्या व्यक्तीसोबत आपली
आयुष्यभर राहण्याची इच्छा असते,
त्या व्यक्तीपासून,
दुर जाणे खुप कठीण असते.
तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले
प्रेम कशाला म्हणतात,
आणि सोडून गेली तेव्हा समजले
खरे प्रेम कशाला म्हणतात.
जवळीक साधून माझ्याशी
कशी किमया केलीस,
वेड लावून माझ्या मनाला
तू का निघून गेलीस.