तुमच्या आयुष्यातला आनंद गणेशाच्या पोटाइतका विशाल असो
तुमच्या आयुष्यातला आनंद
गणेशाच्या पोटाइतका विशाल असो,
अडचणी उंदराइतक्या लहान असो,
आयुष्य सोंडेइतके लांब असो,
क्षण मोदकाइतके गोड असो.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
हरिसी विघ्न जणांचे, असा तू गणांचा राजा,
वससी प्रत्येक हृदयी, असा तू मनांचा राजा,
स्वीकार गणराया तुझिया चरणी, साष्टांग दंडवत माझा.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते,
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला,
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले,
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
येतील गणराज मुषकी बैसोनी
स्वागत करुया तयांचे हसोनी,
आनंदे भरेल घर आणि सदन
घरात येता प्रसन्न गजवदन.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
आम्ही तुझी लेकरं
तूच दे आमची साथ,
तुझ्या कृपेने बाप्पा
होउ दे प्रेमाची बरसात.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
कोणतीही येऊ दे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ,
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
पाहूनी ते गोजिरवाणं रूप
मोह होई मनास खूप,
ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद
होते सदैव दर्शनाची आस.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
किती ही काढल्या प्रतिमा
तुझ्या तरी भरत नाही रे मन,
आम्ही समाधानी त्या दिवशी होऊ
जेव्हा होईल तुझे आगमन.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
देव येतोय माझा
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
तुझ्या आगमनाची घालमेल मिटते माझी.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
वंदितो तुज चरण
आर्जव करतो गणराया,
वरदहस्त असूद्या माथी
राहू द्या सदैव छत्रछाया.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!