आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला,
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले,
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरते
दुःख आणि संकट दूर पळते,
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते,
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
देव येतोय माझा
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
तुझ्या आगमनाची घालमेल मिटते माझी.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली,
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली,
आनंदाने सर्व धरती नटली,
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
वंदितो तुज चरण
आर्जव करतो गणराया,
वरदहस्त असूद्या माथी
राहू द्या सदैव छत्रछाया.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास,
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
कैलासाहून बाप्पा तुझी
सुटली कारे स्वारी,
वाटेत कुठे राहू नकोस
सरळ ये घरी.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले,
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!