मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला,
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले,
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रावण संपला रम्य चतुर्थीची पहाट झाली,
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे, आली आली,
माझ्या गणाधीशाची स्वारी आली.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरते
दुःख आणि संकट दूर पळते,
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते,
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे,
कितीही मोठी समस्या असू दे
बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
सजली अवघी धरती पाहण्यास तुमची कीर्ती,
तुम्ही येणार म्हटल्यावर नसानसात भरली स्फुर्ती,
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रावण सरला
भाद्रपद चतुर्थीची पहाट आली,
सज्ज व्हा फुले उधळायला
गणाधीशाची स्वारी आली.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी,
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला,
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले,
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गजवदन चतुर्थी संकटी मोरयाची,
पूजा बांधिली माणिका मोतियांची,
जुडी वाहिली पुष्प दुर्वांकुरांची,
मनी ध्यायिली मूर्त मोरेश्र्वराची.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
लंबोदराचा घरात आहे निवास,
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
वंदितो तुज चरण
आर्जव करतो गणराया,
वरदहस्त असूद्या माथी
राहू द्या सदैव छत्रछाया.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
वंदन करतो गणरायाला
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला
सुखी ठेव नेहमी सर्व गणेश भक्तांना.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
हरिसी विघ्न जणांचे, असा तू गणांचा राजा,
वससी प्रत्येक हृदयी, असा तू मनांचा राजा,
स्वीकार गणराया तुझिया चरणी, साष्टांग दंडवत माझा.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या आयुष्यातला आनंद
गणेशाच्या पोटाइतका विशाल असो,
अडचणी उंदराइतक्या लहान असो,
आयुष्य सोंडेइतके लांब असो,
क्षण मोदकाइतके गोड असो.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले,
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली,
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली,
आनंदाने सर्व धरती नटली,
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
चारा घालतो गाईला
प्रार्थना करतो गणेशाला,
सुखी ठेव माझ्या मित्राला
हेच वंदन गणपतीला.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
पाहूनी ते गोजिरवाणं रूप
मोह होई मनास खूप,
ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद
होते सदैव दर्शनाची आस.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
येतील गणराज मुषकी बैसोनी
स्वागत करुया तयांचे हसोनी,
आनंदे भरेल घर आणि सदन
घरात येता प्रसन्न गजवदन.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!