सजली अवघी धरती पाहण्यास तुमची कीर्ती,
तुम्ही येणार म्हटल्यावर नसानसात भरली स्फुर्ती,
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
देव येतोय माझा
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
तुझ्या आगमनाची घालमेल मिटते माझी.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले,
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले,
असाच आशीर्वाद कायम राहू दे.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
लंबोदराचा घरात आहे निवास,
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
हरिसी विघ्न जणांचे, असा तू गणांचा राजा,
वससी प्रत्येक हृदयी, असा तू मनांचा राजा,
स्वीकार गणराया तुझिया चरणी, साष्टांग दंडवत माझा.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे,
कितीही मोठी समस्या असू दे
बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या आयुष्यातला आनंद
गणेशाच्या पोटाइतका विशाल असो,
अडचणी उंदराइतक्या लहान असो,
आयुष्य सोंडेइतके लांब असो,
क्षण मोदकाइतके गोड असो.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते,
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
आम्ही तुझी लेकरं
तूच दे आमची साथ,
तुझ्या कृपेने बाप्पा
होउ दे प्रेमाची बरसात.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!