आपल्या भावनांसाठी कोणतीही
बाजारपेठ नाही,
म्हणून आपल्या भावनांची जाहिरात
कधीही करु नका.
मला माझ्या आयुष्यात सगळ्यांचीच
गरज आहे अस नाही,
मला फक्त अशा काही लोकांची गरज आहे
जे खरोखर मला समजुन घेतील.
तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती
परत येत असती तर,
ती व्यक्ती तुम्हाला
एकटे सोडूनच का गेली असती.
जीवनात प्रेम एकदाच करायचे असते,
मन कधी कोणाचे मोडायचे नसते,
ज्याने केला भरवसा,
त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते.
कधी कधी स्वतःच स्वतःला
समजून घ्यावे लागते,
आणि स्वतःच स्वतःला
सांभाळावे लागते.
जे एकतर्फी असतं ना
त्याला खरं प्रेम म्हणायचं,
आणी जेव्हा दोन्ही बाजूने
असतं ना त्याला नशीब समजायचं.
कधीकधी आठवणीच
आपल्याला जास्त दुःखी करतात,
कारण आपल्याला हे माहिती असते की
हे पुन्हा घडणार नाही.
प्रेम कधी मोजुन मापुन केलं जात नाही,
ते कधी इतकं तितक नसत,
एकतर ते असतं किंवा नसतं.
जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी,
पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का,
खेळण्यासाठी.