आपल्याला ज्यांची आठवण येते ना
त्यांनी आपली आठवण तर सोडाच,
आपल्या नावाची उचकी सुध्दा येत नाही.
मला माझ्या आयुष्यात सगळ्यांचीच
गरज आहे अस नाही,
मला फक्त अशा काही लोकांची गरज आहे
जे खरोखर मला समजुन घेतील.
आपल्या भावनांसाठी कोणतीही
बाजारपेठ नाही,
म्हणून आपल्या भावनांची जाहिरात
कधीही करु नका.
कधी कधी स्वतःच स्वतःला
समजून घ्यावे लागते,
आणि स्वतःच स्वतःला
सांभाळावे लागते.
कोण कोणाचे नसते
हे अगोदर समजले असते,
तर हे तुटणारे नाते,
मी कुणाशी जोडलेच नसते.
माझ्या आयुष्यात जर कधी
दुखःचा पाऊस पडला तर तुम्ही
नेहमी माझ्यापाठी छत्री बनुन उभे रहा.
देवा एखादी तर व्यक्ती अशी पाठव
जी आयुष्यभर साथ देईल,
जे येतील ते हृदयाशी खेळुन जात आहेत.
खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.
कधीकधी आठवणीच
आपल्याला जास्त दुःखी करतात,
कारण आपल्याला हे माहिती असते की
हे पुन्हा घडणार नाही.
जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी,
पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का,
खेळण्यासाठी.