देवा एखादी तर व्यक्ती अशी पाठव
जी आयुष्यभर साथ देईल,
जे येतील ते हृदयाशी खेळुन जात आहेत.
कधीकधी आठवणीच
आपल्याला जास्त दुःखी करतात,
कारण आपल्याला हे माहिती असते की
हे पुन्हा घडणार नाही.
माझ्या आयुष्यात जर कधी
दुखःचा पाऊस पडला तर तुम्ही
नेहमी माझ्यापाठी छत्री बनुन उभे रहा.
जे एकतर्फी असतं ना
त्याला खरं प्रेम म्हणायचं,
आणी जेव्हा दोन्ही बाजूने
असतं ना त्याला नशीब समजायचं.
कधी कधी स्वतःच स्वतःला
समजून घ्यावे लागते,
आणि स्वतःच स्वतःला
सांभाळावे लागते.
आठवल तर डोळ्यात अश्रू येतात
नाही आठवल तर मनं छळत,
खरचं प्रेम काय आहे ते
प्रेमात पडल्यावरच कळत.
मला माझ्या आयुष्यात सगळ्यांचीच
गरज आहे अस नाही,
मला फक्त अशा काही लोकांची गरज आहे
जे खरोखर मला समजुन घेतील.
आपल्याला ज्यांची आठवण येते ना
त्यांनी आपली आठवण तर सोडाच,
आपल्या नावाची उचकी सुध्दा येत नाही.
आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका,
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की,
तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो.