कधी कधी स्वतःच स्वतःला
समजून घ्यावे लागते,
आणि स्वतःच स्वतःला
सांभाळावे लागते.
प्रेम कधी मोजुन मापुन केलं जात नाही,
ते कधी इतकं तितक नसत,
एकतर ते असतं किंवा नसतं.
जे एकतर्फी असतं ना
त्याला खरं प्रेम म्हणायचं,
आणी जेव्हा दोन्ही बाजूने
असतं ना त्याला नशीब समजायचं.
कोण कोणाचे नसते
हे अगोदर समजले असते,
तर हे तुटणारे नाते,
मी कुणाशी जोडलेच नसते.
तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती
परत येत असती तर,
ती व्यक्ती तुम्हाला
एकटे सोडूनच का गेली असती.
जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी,
पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का,
खेळण्यासाठी.