देवा एखादी तर व्यक्ती अशी पाठव
जी आयुष्यभर साथ देईल,
जे येतील ते हृदयाशी खेळुन जात आहेत.
अश्रूंना वजन नसले तरी
त्या अश्रू मागील भावना मात्र वजनदार असतात,
म्हणुनच कदाचित रडल्यानंतर मन हलकं होत.
कधी कधी स्वतःच स्वतःला
समजून घ्यावे लागते,
आणि स्वतःच स्वतःला
सांभाळावे लागते.
कधीकधी आठवणीच
आपल्याला जास्त दुःखी करतात,
कारण आपल्याला हे माहिती असते की
हे पुन्हा घडणार नाही.
जे एकतर्फी असतं ना
त्याला खरं प्रेम म्हणायचं,
आणी जेव्हा दोन्ही बाजूने
असतं ना त्याला नशीब समजायचं.
प्रेम कधी मोजुन मापुन केलं जात नाही,
ते कधी इतकं तितक नसत,
एकतर ते असतं किंवा नसतं.
आपल्याला ज्यांची आठवण येते ना
त्यांनी आपली आठवण तर सोडाच,
आपल्या नावाची उचकी सुध्दा येत नाही.
मला माझ्या आयुष्यात सगळ्यांचीच
गरज आहे अस नाही,
मला फक्त अशा काही लोकांची गरज आहे
जे खरोखर मला समजुन घेतील.