मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं
ही तुझी इच्छा होती आणि,
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात
ही माझी इच्छा होती.
मीच मुर्ख होतो जे तुला माझ्या आयुष्यातल्या
प्रवासातला जोडीदार समजून बसलो,
तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण
तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.
मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं
ही तुझी इच्छा होती आणि,
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात
ही माझी इच्छा होती.
जे धोका देवून गेले
त्यांच्या आठवणीत रडण्यापेक्षा,
जे सोबत आहेत त्यांच्या सोबत
हसत जगायला केव्हा ही चांगले.
तु सोडून गेलीस मला तरी
मी वाट पाहणार,
अखेरच्या श्वासापर्यंत
फक्त तुझा अन तुझाच राहणार.
कोण म्हणत प्रेम एकदाच होतं,
ज्यांना हृदयाशी खेळायला जमतं
त्यांना पुन्हा पुन्हा होतं.
कधी वाटलं नव्हतं
एवढ्या लवकर साथ सोडशील,
भेटली तर अशी होतीस
जशी सात जन्म साथ देशील.
आज ही ती
माझ्यासाठी थोडा वेळ खर्च करते,
वेळ मिळेल तेव्हा
फेसबुक वर मला सर्च करते.
गोष्टी संपतात लोक बदलतात
आयुष्यही पुढे जाते,
वेळ ही कोणासाठी थांबत नाही
आणि नेमकं हेच आपल्याला कळतं नाही.
वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते
पण एवढं लक्षात ठेव,
आज तू मला विसरलीस,
उद्या तुला कोणीतरी विसरेल.
काही लोकांना सवय असते
उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं,
आणि गरज संपली की सोडून द्यायचं.
प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती,
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी किती.
माझं आयुष्य सुध्दा
त्या चंद्रासारखं आहे,
खुश तर खुप आहे
पण एकटा ही तेवढाच आहे.
कळत नाही आज का
मन माझे भरून येत आहे,
सारे सोबत असूनही का
एकटेपणाची जाणीव होत आहे.
नाही म्हणालीस जरी तू,
नाही दुखी होणार मी,
जगत होतो, जगत आहे,
जगतच राहणार मी.
लोकांना तुमच्या असण्याने फरक पडतो,
अन्यथा तुमच्या नसण्याची
लोक हळू हळू सवय करून घेतात.
चेहऱ्यावर नेहमीच हसू
पण मनात खूप काही साठलेलं,
आले जरी डोळे भरून
ते कोणालाही न दिसलेलं.
विसरून जा तिला जी तुला विसरेल
बघू नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून
जी स्वतः रडून जी तुला हसवेल.
पहिलं प्रेम हे लहानपणाच्या
जखमे सारखं असतं,
जखम तर भरते पण
त्या जखमेची आठवण मात्र कायम राहते.
ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी
फक्त तेच अपेक्षा भंग करतात.
मनापासुन प्रेम करणारेच
फक्त आठवणीत रडतात.
मनातल्या भावना तुला सांगायला
मी थोडा घाबरतोय,
तुच कधीतरी समजुन घेशील
अशी आशा मी करतोय.