मला याच अजिबात वाईट वाटत नाही
की तू माझी नाही झालीस,
सुख तर या गोष्टीच आहे कि
कधीतरी तू माझी होतीस.
काही लोकांना सवय असते
उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं,
आणि गरज संपली की सोडून द्यायचं.
आठवण नको काढू म्हणालीस
तरी ते शक्य आहे का,
तुझ्यापासुन वेगळ होऊन माझ्या जीवनाला
काही अर्थ आहे का.
मला याच अजिबात वाईट वाटत नाही
की तू माझी नाही झालीस,
सुख तर या गोष्टीच आहे कि
कधीतरी तू माझी होतीस.
जेव्हा भूतकाळाच्या आठवणी ताज्या होतात,
तेव्हा भरलेल्या जखमा
नकळत पुन्हा चिघळल्या जातात.
खूप प्रेम केलं होतं तिच्यावर
आता कुणावर करूच शकत नाही.
खूप स्वप्नं पाहिली होती तिची
जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.
प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती,
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी किती.
मी तुला मिळवत असतांना,
तु मला कुठेतरी गमावत होतीस,
मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र,
तु माझ्या नजरेतून उतरत होतीस.
हसणारा चेहरा तर सगळेच पाहू शकतात,
परंतु तुटलेले हृदय असलेला चेहरा
हे ठरावीक लोकच ओळखु शकतात.
लोक तुटलेला तारा पाहुन त्याच्याकडे
इच्छा पुर्ण होऊ दे म्हणुन हात जोडतात,
पण जो स्वतः तुटलेला आहे
तो तुमची इच्छा काय पुर्ण करणार.
नाही म्हणालीस जरी तू,
नाही दुखी होणार मी,
जगत होतो, जगत आहे,
जगतच राहणार मी.
प्रेम मी ही केलं, प्रेम तिनं ही केलं
फरक फक्त एवढाच होता की
मी प्रेम केलं तिला मिळवण्यासाठी
तिने प्रेम केलं वेळ घालवण्यासाठी.
कधी वाटलं नव्हतं
एवढ्या लवकर साथ सोडशील,
भेटली तर अशी होतीस
जशी सात जन्म साथ देशील.
आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट
चिंब चिंब भिजली होती,
तेव्हा आठवले कुशीत माझ्या
येऊन तू निजली होती.
ती नेहमी म्हणायची,
जे होते ते चांगल्यासाठीच होते,
मग तिचं मला सोडून जाणे
हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या?
परकचं करायच होत
तर जवळ का गं घेतलस,
विश्वासच नव्हता तर
प्रेम का गं केलस.
जाऊ दे तिला मला सोडून दुसऱ्याच्या मिठी मध्ये
तसेही एवढ प्रेम करून सुद्धा जी माझी नाही झाली,
दुसऱ्याची तरी कशी होणार?
मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं
ही तुझी इच्छा होती आणि,
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात
ही माझी इच्छा होती.
आता काहीच फरक नाही पडत
स्वप्न अपूर्ण राहताना,
कारण खुप जवळून पाहिले आहे
मी काही स्वप्न पुर्ण होता होता तुटताना.
चेहऱ्यावर नेहमीच हसू
पण मनात खूप काही साठलेलं,
आले जरी डोळे भरून
ते कोणालाही न दिसलेलं.
तु सोडून गेलीस मला तरी
मी वाट पाहणार,
अखेरच्या श्वासापर्यंत
फक्त तुझा अन तुझाच राहणार.