कोणाला सापडणार नाही
इतकं सार माझे हरवलय,
आणि कोणाला सापडल तरी
ओळखायच नाही असं ठरवलय.
आता काहीच फरक नाही पडत
स्वप्न अपूर्ण राहताना,
कारण खुप जवळून पाहिले आहे
मी काही स्वप्न पुर्ण होता होता तुटताना.
थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय,
पण धन्यवाद! तू इथवर आलीस,
सारे आयुष्य नसलीस तरी,
चार पाऊले माझी झालीस.
ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली
तुझ्यासारखे खूप भेटतील मला,
मी पण हसून तिला विचारलं
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला.
ती नेहमी म्हणायची,
जे होते ते चांगल्यासाठीच होते,
मग तिचं मला सोडून जाणे
हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या?
ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी
फक्त तेच अपेक्षा भंग करतात.
मनापासुन प्रेम करणारेच
फक्त आठवणीत रडतात.
मला याच अजिबात वाईट वाटत नाही
की तू माझी नाही झालीस,
सुख तर या गोष्टीच आहे कि
कधीतरी तू माझी होतीस.
कोण म्हणत प्रेम एकदाच होतं,
ज्यांना हृदयाशी खेळायला जमतं
त्यांना पुन्हा पुन्हा होतं.
तु सोडून गेलीस मला तरी
मी वाट पाहणार,
अखेरच्या श्वासापर्यंत
फक्त तुझा अन तुझाच राहणार.
हसणारा चेहरा तर सगळेच पाहू शकतात,
परंतु तुटलेले हृदय असलेला चेहरा
हे ठरावीक लोकच ओळखु शकतात.
प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती,
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी किती.
मी तिला माफ केलं
कारण माझं तिच्यावर प्रेम होत,
तीनं मला धोका दिला
कारण तिचं दुसऱ्यावर प्रेम होतं.
मनातल्या भावना तुला सांगायला
मी थोडा घाबरतोय,
तुच कधीतरी समजुन घेशील
अशी आशा मी करतोय.
माझं आयुष्य सुध्दा
त्या चंद्रासारखं आहे,
खुश तर खुप आहे
पण एकटा ही तेवढाच आहे.
आज ही ती
माझ्यासाठी थोडा वेळ खर्च करते,
वेळ मिळेल तेव्हा
फेसबुक वर मला सर्च करते.
लोकांना तुमच्या असण्याने फरक पडतो,
अन्यथा तुमच्या नसण्याची
लोक हळू हळू सवय करून घेतात.
आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट
चिंब चिंब भिजली होती,
तेव्हा आठवले कुशीत माझ्या
येऊन तू निजली होती.
लोक तुटलेला तारा पाहुन त्याच्याकडे
इच्छा पुर्ण होऊ दे म्हणुन हात जोडतात,
पण जो स्वतः तुटलेला आहे
तो तुमची इच्छा काय पुर्ण करणार.
खूप प्रेम केलं होतं तिच्यावर
आता कुणावर करूच शकत नाही.
खूप स्वप्नं पाहिली होती तिची
जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.
वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते
पण एवढं लक्षात ठेव,
आज तू मला विसरलीस,
उद्या तुला कोणीतरी विसरेल.
आठवण नको काढू म्हणालीस
तरी ते शक्य आहे का,
तुझ्यापासुन वेगळ होऊन माझ्या जीवनाला
काही अर्थ आहे का.