ती मला नेहमी म्हणायची की,
मी तुला माझं करूनच सोडेन,
आज तिने तेच केलं,
तिने मला तिचं करूनच सोडलं.
आठवण नको काढू म्हणालीस
तरी ते शक्य आहे का,
तुझ्यापासुन वेगळ होऊन माझ्या जीवनाला
काही अर्थ आहे का.
मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं
ही तुझी इच्छा होती आणि,
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात
ही माझी इच्छा होती.
आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट
चिंब चिंब भिजली होती,
तेव्हा आठवले कुशीत माझ्या
येऊन तू निजली होती.
पहिलं प्रेम हे लहानपणाच्या
जखमे सारखं असतं,
जखम तर भरते पण
त्या जखमेची आठवण मात्र कायम राहते.
ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी
फक्त तेच अपेक्षा भंग करतात.
मनापासुन प्रेम करणारेच
फक्त आठवणीत रडतात.
चेहऱ्यावर नेहमीच हसू
पण मनात खूप काही साठलेलं,
आले जरी डोळे भरून
ते कोणालाही न दिसलेलं.
वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते
पण एवढं लक्षात ठेव,
आज तू मला विसरलीस,
उद्या तुला कोणीतरी विसरेल.
कोण म्हणत प्रेम एकदाच होतं,
ज्यांना हृदयाशी खेळायला जमतं
त्यांना पुन्हा पुन्हा होतं.
मी तिला माफ केलं
कारण माझं तिच्यावर प्रेम होत,
तीनं मला धोका दिला
कारण तिचं दुसऱ्यावर प्रेम होतं.
आज माझ्याच सावलीला विचारलं मी,
का चालते तू माझ्यासोबत,
सावलीने पण हसत उत्तर दिलं,
कोण आहे दुसरं तुझ्या सोबत.
विसरून जा तिला जी तुला विसरेल
बघू नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून
जी स्वतः रडून जी तुला हसवेल.
गोष्टी संपतात लोक बदलतात
आयुष्यही पुढे जाते,
वेळ ही कोणासाठी थांबत नाही
आणि नेमकं हेच आपल्याला कळतं नाही.
ती नेहमी म्हणायची,
जे होते ते चांगल्यासाठीच होते,
मग तिचं मला सोडून जाणे
हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या?
परकचं करायच होत
तर जवळ का गं घेतलस,
विश्वासच नव्हता तर
प्रेम का गं केलस.
ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली
तुझ्यासारखे खूप भेटतील मला,
मी पण हसून तिला विचारलं
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला.
मला याच अजिबात वाईट वाटत नाही
की तू माझी नाही झालीस,
सुख तर या गोष्टीच आहे कि
कधीतरी तू माझी होतीस.
आज ही ती
माझ्यासाठी थोडा वेळ खर्च करते,
वेळ मिळेल तेव्हा
फेसबुक वर मला सर्च करते.
प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती,
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी किती.
माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.
कधी वाटलं नव्हतं
एवढ्या लवकर साथ सोडशील,
भेटली तर अशी होतीस
जशी सात जन्म साथ देशील.