जीवनात जोडलेली नाती
कधी तोडायची नसतात,
छोट्याश्या वादळानं
विश्वासाची घर मोडायची नसतात.
माझ्यापासून दूरच जायचंय,
तर खुशाल जा.
फक्त एवढंच लक्षात ठेव,
पुन्हा मागे वळून बघायची
मला पण सवय नाही.
कुठेही रहा पण सुखात रहा
सुख माझे त्यात आहे,
स्वतःचा जीव जपत रहा
कारण जीव माझा तुझ्यात आहे.
जेव्हा काही खास लोक
आपल्याला दुर्लक्षित करत असतील,
तेव्हा समजून जा की,
त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.
प्रेमात एकदा खाल्ला धोका
आता प्रेमात पडायची इच्छाच नाही,
आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचं
आता परत रडायची इच्छाच नाही.
भावना मलाही आहेत
पण त्या मुक्त करता येत नाहीत,
गहिवरल्या मनातून त्या
व्यक्त करता येत नाहीत.
कोसळणारा पाऊस पाहून
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे
पण हा कोणासाठी रडतो.
जेव्हा तुमची जवळची व्यक्ती
तुमच्यावर रागवायची बंद होते
तेव्हा समजून जा,
तुमची त्यांच्या आयुष्यातली
महत्वाची जागा गमावलीत.
माहिती आहे तुझ्या नजरेत
मला काहीच किंमत नाही.
पण माझी किंमत त्यांना विचार,
ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही.
जवळची नाती ही माणसाला
कधी कधी खूप छळतात,
जितके जास्त जपाल तितके
आपणाला आणखी दुर लोटतात.
कधी कधी एकटं राहणं सुद्धा
चांगलं असतं कारण,
एकटे असल्यावर कोणी
आपलं मन दुखवत नसतं.
कोणाची आठवण येणं कठीण नाही
कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे,
असे मोजकेच असतात
तेच आयुष्यभर साथ देतात.
प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी
हिशोब उरलाय तो फक्त,
तू दिलेल्या जखमांचा.
नाती ही झाडाच्या पानासारखी असतात,
एकदा तुटली की
त्यांची हिरवळ कायमची निघून जाते.
कुणाला कितीही आपण
आपलं मानलं तरीही,
शेवटी ते परकेच ठरतात.
ज्याच्यावर आपण
डोळे बंद करून विश्वास ठेवतो ना,
तेच लोक
आपला विश्वासघात करतात.
वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,
स्वप्नातील घर तुझे माझे
आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.
छोटे छोटे रिप्लाय
येऊ लागले की समजायचं,
मोठे मोठे मेसेज
दूसरी कडे जात आहेत.
कधी कोणाच्या डोळ्यामध्ये
पाणी येऊ देऊ नये,
हसवता नाही आलं तरी
अश्रूंचं कारण होऊ नये.
कधीतर संपेल ना हा त्रास
संपेल कधी तर हा एकटेपणा,
चार दिवसाच्या आयुष्यात
एक दिवस तरी चांगला असेलच ना.
प्रेमाची खरी किंमत
ते दूर गेल्यावर कळते,
कितीही दुर्लक्ष केले तरी,
नजर मात्र तिथेच वळते.