कोणाची आठवण येणं कठीण नाही
कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे,
असे मोजकेच असतात
तेच आयुष्यभर साथ देतात.
भावना मलाही आहेत
पण त्या मुक्त करता येत नाहीत,
गहिवरल्या मनातून त्या
व्यक्त करता येत नाहीत.
तू दिलेल्या दुःखाने
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते
शेवटी तूच मला दाखवले.
आज पर्यत जे बोलता नाही आले
आज ते सारे तुझ्यापुढे बोलणार,
नाही जगु शकत तुझ्याशिवाय
हेच तुला सांगणार.
नाती ही झाडाच्या पानासारखी असतात,
एकदा तुटली की
त्यांची हिरवळ कायमची निघून जाते.
जगाची रीतच न्यारी आहे,
इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे,
मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे,
पण शक्य आहे तोपर्यंत, माझा हातात हात घे.
एखाद्याला सोडून जातांना,
मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये,
जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा,
जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं.
प्रेमाची खरी किंमत
ते दूर गेल्यावर कळते,
कितीही दुर्लक्ष केले तरी,
नजर मात्र तिथेच वळते.
तुझ्या अशा फसवणुकीने
मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास,
ओळखीच्या माणसाशी देखील
आता तयार नसते बोलण्यास.
कोसळणारा पाऊस पाहून
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे
पण हा कोणासाठी रडतो.
प्रेमात एकदा खाल्ला धोका
आता प्रेमात पडायची इच्छाच नाही,
आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचं
आता परत रडायची इच्छाच नाही.
तुझ्यासाठी बघ मी
किती मोठं मन केलं,
तुला आवडतं खेळायला म्हणून
हृदयाचं खेळणं केलं.
रहा तु कुठेही
पण जप मात्र स्वतःला.
आडोशाला उभे राहून
पाहीन मी तुझ्या सुखाला.
होईलच तुला एक दिवस सखे
माझ्या भोळ्या प्रेमाची जाणीव,
भ्रमर कुणी जाता हात सोडून
भासेल तुला फक्त माझीच उणीव.
आठवणीत नाही ठेवलस तरी चालेल
पण विसरायचा प्रयत्न करु नको,
तुझ्यासाठी जग सोडायची तयारी आहे माझी
पण तु दुसऱ्यासाठी मला सोडु नको.
रस्ता बघून चल
नाहीतर एक दिवस असा येईल,
की वाटेतले मुके दगडही
प्रश्न विचारू लागतील.
तुझ्यासाठी खूप सोपे असेल
मला विसरणं,
पण माझ्यासाठी खूप कठीण आहे,
तुला विसरून जगणं.
वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,
स्वप्नातील घर तुझे माझे
आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.
प्रेम तेव्हा ही होते
आताही आहे यापुढे ही राहील,
ते कॉलेज थोडेच आहे
पुर्ण झालं की सोडायला.
जेव्हा तुमची जवळची व्यक्ती
तुमच्यावर रागवायची बंद होते
तेव्हा समजून जा,
तुमची त्यांच्या आयुष्यातली
महत्वाची जागा गमावलीत.
ज्याच्यावर आपण
डोळे बंद करून विश्वास ठेवतो ना,
तेच लोक
आपला विश्वासघात करतात.