प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी
हिशोब उरलाय तो फक्त,
तू दिलेल्या जखमांचा.
रस्ता बघून चल
नाहीतर एक दिवस असा येईल,
की वाटेतले मुके दगडही
प्रश्न विचारू लागतील.
तू दिलेल्या दुःखाने
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते
शेवटी तूच मला दाखवले.
कोणाची आठवण येणं कठीण नाही
कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे,
असे मोजकेच असतात
तेच आयुष्यभर साथ देतात.
एवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ,
माझ्या डोळ्यातील आसवांतल्या
वेदना ओळखून बघ.
कोसळणारा पाऊस पाहून
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे
पण हा कोणासाठी रडतो.
माहिती आहे तुझ्या नजरेत
मला काहीच किंमत नाही.
पण माझी किंमत त्यांना विचार,
ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही.
जवळची नाती ही माणसाला
कधी कधी खूप छळतात,
जितके जास्त जपाल तितके
आपणाला आणखी दुर लोटतात.
नेहमीच आनंद मिळेल असे नाही,
कधी कधी दुःख पण सोसावे लागते,
कितीही अहंकारी असाल तरीही,
प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते.
नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो,
जो हृदयात असतो तो नशिबात नसतो
आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो.
आठवणीत नाही ठेवलस तरी चालेल
पण विसरायचा प्रयत्न करु नको,
तुझ्यासाठी जग सोडायची तयारी आहे माझी
पण तु दुसऱ्यासाठी मला सोडु नको.
प्रेमात एकदा खाल्ला धोका
आता प्रेमात पडायची इच्छाच नाही,
आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचं
आता परत रडायची इच्छाच नाही.
कुठेही रहा पण सुखात रहा
सुख माझे त्यात आहे,
स्वतःचा जीव जपत रहा
कारण जीव माझा तुझ्यात आहे.
तुझ्यासाठी खूप सोपे असेल
मला विसरणं,
पण माझ्यासाठी खूप कठीण आहे,
तुला विसरून जगणं.
होईलच तुला एक दिवस सखे
माझ्या भोळ्या प्रेमाची जाणीव,
भ्रमर कुणी जाता हात सोडून
भासेल तुला फक्त माझीच उणीव.
प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी
हिशोब उरलाय तो फक्त,
तू दिलेल्या जखमांचा.
प्रेम तेव्हा ही होते
आताही आहे यापुढे ही राहील,
ते कॉलेज थोडेच आहे
पुर्ण झालं की सोडायला.
जीवनात जोडलेली नाती
कधी तोडायची नसतात,
छोट्याश्या वादळानं
विश्वासाची घर मोडायची नसतात.
प्रेम त्याच्यावर करा
ज्याचे हृदय आधीच तुटलेले आहे,
कारण हृदय तुटण्याचे दुःख
त्याच्याइतके कुणालाच माहित नसते.
रहा तु कुठेही
पण जप मात्र स्वतःला.
आडोशाला उभे राहून
पाहीन मी तुझ्या सुखाला.
छोटे छोटे रिप्लाय
येऊ लागले की समजायचं,
मोठे मोठे मेसेज
दूसरी कडे जात आहेत.