जगाची रीतच न्यारी आहे,
इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे,
मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे,
पण शक्य आहे तोपर्यंत, माझा हातात हात घे.
प्रेमाची खरी किंमत
ते दूर गेल्यावर कळते,
कितीही दुर्लक्ष केले तरी,
नजर मात्र तिथेच वळते.
प्रेम करणं खुप सोपी गोष्ट आहे
पण ते ज्या व्यक्तीवर आहे,
त्या व्यक्तीला पटवून देणं
खुप अवघड आहे.
जगाची रीतच न्यारी आहे,
इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे,
मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे,
पण शक्य आहे तोपर्यंत, माझा हातात हात घे.
ज्याच्यावर आपण
डोळे बंद करून विश्वास ठेवतो ना,
तेच लोक
आपला विश्वासघात करतात.
जवळची नाती ही माणसाला
कधी कधी खूप छळतात,
जितके जास्त जपाल तितके
आपणाला आणखी दुर लोटतात.
कधीतर संपेल ना हा त्रास
संपेल कधी तर हा एकटेपणा,
चार दिवसाच्या आयुष्यात
एक दिवस तरी चांगला असेलच ना.
एवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ,
माझ्या डोळ्यातील आसवांतल्या
वेदना ओळखून बघ.
तुझ्यासाठी बघ मी
किती मोठं मन केलं,
तुला आवडतं खेळायला म्हणून
हृदयाचं खेळणं केलं.
रस्ता बघून चल
नाहीतर एक दिवस असा येईल,
की वाटेतले मुके दगडही
प्रश्न विचारू लागतील.
कुणाला कितीही आपण
आपलं मानलं तरीही,
शेवटी ते परकेच ठरतात.
भावना मलाही आहेत
पण त्या मुक्त करता येत नाहीत,
गहिवरल्या मनातून त्या
व्यक्त करता येत नाहीत.
कुठेही रहा पण सुखात रहा
सुख माझे त्यात आहे,
स्वतःचा जीव जपत रहा
कारण जीव माझा तुझ्यात आहे.
तू दिलेल्या दुःखाने
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते
शेवटी तूच मला दाखवले.
प्रेम तेव्हा ही होते
आताही आहे यापुढे ही राहील,
ते कॉलेज थोडेच आहे
पुर्ण झालं की सोडायला.
नेहमीच आनंद मिळेल असे नाही,
कधी कधी दुःख पण सोसावे लागते,
कितीही अहंकारी असाल तरीही,
प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते.
तुझ्या अशा फसवणुकीने
मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास,
ओळखीच्या माणसाशी देखील
आता तयार नसते बोलण्यास.
जेव्हा काही खास लोक
आपल्याला दुर्लक्षित करत असतील,
तेव्हा समजून जा की,
त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.
प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी
हिशोब उरलाय तो फक्त,
तू दिलेल्या जखमांचा.
आज पर्यत जे बोलता नाही आले
आज ते सारे तुझ्यापुढे बोलणार,
नाही जगु शकत तुझ्याशिवाय
हेच तुला सांगणार.
तुझ्यासाठी खूप सोपे असेल
मला विसरणं,
पण माझ्यासाठी खूप कठीण आहे,
तुला विसरून जगणं.