स्टाइल असं करा कि लोक बघत राहतील,
आणि दोस्ती अशी करा कि लोक जळत राहतील.
एका वर्षात पन्नास मित्र बनवणे सोपं आहे,
पण पन्नास वर्ष एकासोबतच मैत्री ठेवणे कठीण आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कधी हसायचे असते कधी रुसायचे असते,
मैत्रीरुपी वृक्षाला आयुष्य भर जपायच असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
श्वासातला श्वास असते मैत्री,
ओठातला घास असते मैत्री,
काळजाला काळजाची आस असते मैत्री,
कोणीही जवळ नसताना तुझी साथ असते मैत्री.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हजार मित्र करण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजारो लोक तुमच्या विरोधात असतानाही
तुमच्या बाजूने असेल.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मातीचे मडके आणि मैत्रीची किंमत
फक्त बनवण्याऱ्यांनाच माहीत असते,
तोडणाऱ्यांना नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
त्रास फक्त प्रेमामध्ये होतो असं नाही,
एकदा जीवापाड मैत्री करून बघा
प्रेमापेक्षा जास्त त्रास मैत्रीत होतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आमची मैत्री समजायला थोडा वेळ लागेल
आणि जेव्हा समजेल तेव्हा तुम्हाला वेड लागेल.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जीवनात दोनच मित्र कमवा,
एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी
युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल,
आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही
चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युध्द करेल.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मित्र गरज म्हणून नाही
तर सवय म्हणून जोडा,
कारण गरज संपली जाते
पण सवयी कधीच सुटत नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!