देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो,
अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो,
ज्यांना कधी ओळखतही नसतो,
त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मित्र म्हणजे, एक आधार,
एक विश्वास, एक आपुलकी,
आणि एक अनमोल साथ
जी मला मिळाली, तुझ्या रूपाने.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्टाइल अशी करा कि लोक बघत राहतील,
आणि दोस्ती अशी करा कि लोक जळत राहतील.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई म्हणजे भेटीला आलेला देव,
पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट,
आणि मित्र म्हणजे,
देवाला ही न मिळणारी भेट.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्यात एक मैत्रीण आरशासारखी
आणि सावलीसारखी कमवा,
कारण आरसा कधी खोट दाखवत नाही
आणि सावली कधी साथ सोडत नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो,
विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
खऱ्या मैत्रीसाठी दररोज भेटण्याची व बोलण्याची गरज नसते,
कारण खरे मित्र हे कधीच हृदयापासून दूर गेलेले नसतात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,
जर निभावणारे कट्टर असतील ना
तर सारी दुनिया सलाम करते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तु
प्रमाणे फार काळजी पूर्वक जपायची असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही ,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी ,
तुझे आणी माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!