स्टाइल अशी करा कि लोक बघत राहतील,
आणि दोस्ती अशी करा कि लोक जळत राहतील.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
निसर्गाला रंग हवा असतो,
फुलांना गंध हवा असतो,
माणुस हा एकटा कसा राहणार, कारण
त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई म्हणजे भेटीला आलेला देव,
पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट,
आणि मित्र म्हणजे,
देवाला ही न मिळणारी भेट.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
नुसता रुबाबच नाही तर धमक पण आहे,
नुसता पैसा नाही तर मनाची श्रीमंती पण आहे,
आणि म्हणुनच तुम्ही मित्र असल्याचा
नुसता गर्वच नाही तर माज पण आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी
पाण्याचे सिंचन आवश्यक असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,
जर निभावणारे कट्टर असतील ना
तर सारी दुनिया सलाम करते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
फुलांबरोबर काय मैत्री करायची
ती तर एकदा फुलतात आणि कोमेजून जातात,
मैत्री करायची असेल तर ती काट्यांसोबत करावी
एकदा टोचलं की कायम लक्षात राहतात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जीवनात दोनच मित्र कमवा,
एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी
युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल,
आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही
चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युध्द करेल.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग
म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
चांगल्या काळात हात धरणं म्हणजे मैत्री नव्हे,
तर वाईट काळातही हात न सोडणं म्हणजे मैत्री.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!