कुठलंही नातं नसताना
आयुष्यभर साथ देते ती मैत्री.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येकाच्या आयुष्यात ती एक मैत्रीण असतेच
जिला थोडं काही बोललं तर लगेच फुगून बसते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
फुलांबरोबर काय मैत्री करायची
ती तर एकदा फुलतात आणि कोमेजून जातात,
मैत्री करायची असेल तर ती काट्यांसोबत करावी
एकदा टोचलं की कायम लक्षात राहतात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हाला जर मित्र हवे असतील,
तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तु
प्रमाणे फार काळजी पूर्वक जपायची असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
दोन गोष्टी सोडुन मैत्री करा,
एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज काल जळणारे भरपूर झालेत,
त्यांना जळु दया,
आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत
हे त्यांना कळू दया.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते,
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजु शकेल.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
श्वासातला श्वास असते मैत्री,
ओठातला घास असते मैत्री,
काळजाला काळजाची आस असते मैत्री,
कोणीही जवळ नसताना तुझी साथ असते मैत्री.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आमची मैत्री समजायला थोडा वेळ लागेल
आणि जेव्हा समजेल तेव्हा तुम्हाला वेड लागेल.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!