आई म्हणजे भेटीला आलेला देव,
पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट,
आणि मित्र म्हणजे,
देवाला ही न मिळणारी भेट.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्यात एक मैत्रीण आरशासारखी
आणि सावलीसारखी कमवा,
कारण आरसा कधी खोट दाखवत नाही
आणि सावली कधी साथ सोडत नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग
म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मित्र म्हणजे, एक आधार,
एक विश्वास, एक आपुलकी,
आणि एक अनमोल साथ
जी मला मिळाली, तुझ्या रूपाने.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
नुसता रुबाबच नाही तर धमक पण आहे,
नुसता पैसा नाही तर मनाची श्रीमंती पण आहे,
आणि म्हणुनच तुम्ही मित्र असल्याचा
नुसता गर्वच नाही तर माज पण आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सगळी नाती ही जन्माच्या आधीपासूनच तयार असतात,
पण जन्मल्यानंतर एकच नातं आहे
जे स्वतःला तयार करता येतं ते म्हणजे मैत्री.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आमची मैत्री समजायला थोडा वेळ लागेल
आणि जेव्हा समजेल तेव्हा तुम्हाला वेड लागेल.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही ,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी ,
तुझे आणी माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रेमाच्या चौकात कितीपण फिरा,
मित्रांच्या कट्यांवर येणारी मज्जा
काही औरच असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जेव्हा आपल्याला पैसे, सल्ले, सोबत
आणि ज्ञानाची गरज असते तेव्हा
मित्र नेहमीच तुमच्यासाठी असतात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!