चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते,
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजु शकेल.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आमची मैत्री समजायला थोडा वेळ लागेल
आणि जेव्हा समजेल तेव्हा तुम्हाला वेड लागेल.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्री म्हटली की आठवतं ते बालपण आणि
मैत्रीतून मिळालेलं ते खरखुरं शहाणपण.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो,
विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
चांगल्या काळात हात धरणं म्हणजे मैत्री नव्हे,
तर वाईट काळातही हात न सोडणं म्हणजे मैत्री.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
दोन गोष्टी सोडुन मैत्री करा,
एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अनुभव सांगतो की एक विश्वासू मित्र,
हजार नातेवाईकां पेक्षा चांगला असतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्यात एक मैत्रीण आरशासारखी
आणि सावलीसारखी कमवा,
कारण आरसा कधी खोट दाखवत नाही
आणि सावली कधी साथ सोडत नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो,
अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो,
ज्यांना कधी ओळखतही नसतो,
त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
समोरच्या मनाची काळजी तुम्ही
तुमच्या मनापेक्षा जास्त घेता,
याची जाणीव म्हणजे मैत्री.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
नुसता रुबाबच नाही तर धमक पण आहे,
नुसता पैसा नाही तर मनाची श्रीमंती पण आहे,
आणि म्हणुनच तुम्ही मित्र असल्याचा
नुसता गर्वच नाही तर माज पण आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
निसर्गाला रंग हवा असतो,
फुलांना गंध हवा असतो,
माणुस हा एकटा कसा राहणार, कारण
त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,
जर निभावणारे कट्टर असतील ना
तर सारी दुनिया सलाम करते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी
पाण्याचे सिंचन आवश्यक असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला
विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जीवनात कितीही मित्र भेटू द्या,
पण आपल्या शाळेतल्या
मित्रांना कधीच विसरता येत नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तु
प्रमाणे फार काळजी पूर्वक जपायची असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्रीमध्ये जरुरी नसते दररोजची भेट,
येथे हृदयाचा हृदयाशी संवाद असतो थेट.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्टाइल असं करा कि लोक बघत राहतील,
आणि दोस्ती अशी करा कि लोक जळत राहतील.
एकटे असल्यावर झालेला खरा खूरा भास म्हणजे मैत्री,
मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!