फुलांबरोबर काय मैत्री करायची
ती तर एकदा फुलतात आणि कोमेजून जातात,
मैत्री करायची असेल तर ती काट्यांसोबत करावी
एकदा टोचलं की कायम लक्षात राहतात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्यात एक मैत्रीण आरशासारखी
आणि सावलीसारखी कमवा,
कारण आरसा कधी खोट दाखवत नाही
आणि सावली कधी साथ सोडत नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्नेहाचं हे बंधन असंच टिकू दे,
मैत्रीचं हे गाणं आयुष्यभर गुणगुणू दे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
श्वासातला श्वास असते मैत्री,
ओठातला घास असते मैत्री,
काळजाला काळजाची आस असते मैत्री,
कोणीही जवळ नसताना तुझी साथ असते मैत्री.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मित्र म्हणजे एक आधार
एक विश्वास एक आपूलकी,
आणि एक अनमोल साथ
जी मला मिळाली तूझ्या रूपाने.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्रीमध्ये जरुरी नसते दररोजची भेट,
येथे हृदयाचा हृदयाशी संवाद असतो थेट.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्री म्हटली की आठवतं ते बालपण आणि
मैत्रीतून मिळालेलं ते खरखुरं शहाणपण.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
असे हृदय तयार करा की, त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की, हृदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही,
अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते,
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजु शकेल.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हाला जर मित्र हवे असतील,
तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!