Trending - Holi

Friday | Army | Attitude | Congratulations 🎉 | Good Morning 🌞 | Good Night 😴 | Love 💕 | Motivational 🔥 | Rain 🌧️ | Sad 😢 | Name On Cake 🎂


Home Friendship Day Wishes Happy Friendship Day Wishes Images in Marathi - मैत्री दिनाच्या शुभेच्छा

मित्र तुला मानलय मैत्रीचा अपमान कधी करू नकोस

मित्र तुला मानलय मैत्रीचा अपमान कधी करू नकोसमित्र तुला मानलय
मैत्रीचा अपमान कधी करू नकोस.
जग फार मोठं आहे
त्यात मित्रांना कधी विसरु नकोस.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसतेजिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैत्री असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपीमैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी
मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकतनाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत,
नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते,
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत,
जमीन मुळात ओली असावी लागते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारेमैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारे,
जुन्या आठवणींना उजाळा देत
गालातल्या गालात हसणारे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपले मनातले वजन कमी करण्याचे ठिकाण म्हणजे मैत्रीआपले मनातले वजन कमी
करण्याचे ठिकाण म्हणजे मैत्री,
जे रक्ताचं नसूनही रक्तारक्तात
भिनतं ते नातं म्हणजे मैत्री.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु देओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे,
जीवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे,
जीवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु दे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बंधना पलीकडे एक नाते असावेबंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
एक प्रेमळ भावनांचा आधार असावा,
दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

निळ्याशार सागराला आपल्या मैत्रीची ओढ वाटावीनिळ्याशार सागराला
आपल्या मैत्रीची ओढ वाटावी,
उसळणाऱ्या लाटांना
आपल्या भेटीची आस असावी.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्ताची नाती जन्माने मिळतात मानलेली नाती मनाने जुळतातरक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जीवन आहे तर आठवणी आहेत आठवण आहे तर भावना आहेतजीवन आहे तर आठवणी आहेत
आठवण आहे तर भावना आहेत,
भावना तिथेच आहे जिथे मैत्री आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री म्हणजे आपल्या विचारात सतत कुणीतरी येणंमैत्री म्हणजे आपल्या विचारात सतत कुणीतरी येणं,
मैत्री म्हणजे न मागता समोरच्याला भरभरून देणं.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

काय फरक पडतो मैत्री जुनी असते की नवी असतेकाय फरक पडतो
मैत्री जुनी असते की नवी असते,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
मैत्री मात्र हवी असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मित्राचा राग आला तरी त्यांना सोडता येत नाहीमित्राचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही,
कारण दुःख असो वा सुख
ते आपल्याला एकटे कधीच सोडत नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री करण्याचा अंदाज पाहिजेमैत्री करण्याचा अंदाज पाहिजे,
आठवण येण्याचे कारण पाहिजे,
तू कॉल कर किंवा नको करू,
पण तुझा एक प्रेमळ मेसेज रोज यायला पाहिजे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जीवनात अनेक मैत्रिणी येतात जातातजीवनात अनेक मैत्रिणी येतात जातात,
पण अशी एक मैत्रीण असते,
जी आपल्या हृदयात घर करून राहिलेली असते,
आणि ती मैत्रीण माझ्यासाठी तूच आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री हसवणारी असावी मैत्री चिडवणारी असावीमैत्री हसवणारी असावी, मैत्री चिडवणारी असावी,
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी,
पण कधीच बदलणारी नसावी.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाहीपावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्री मधुन मिळतो,
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
कधी तरी उन्हातुन आल्यावरच कळतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री असावी चंदनासारखी सुगंध देणाऱ्‍या फुलासारखीमैत्री असावी चंदनासारखी, सुगंध देणाऱ्‍या फुलासारखी,
जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी,
प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय  जे कधी तिरस्कार करत नाहीमैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय
जे कधी तिरस्कार करत नाही,
एका गालावरील खळी
जी कधीही रडू देत नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री असावी मना मनाची मैत्री असावी जन्मो जन्मांचीमैत्री असावी मना मनाची,
मैत्री असावी जन्मो जन्मांची,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


Categories