विसरु नको तु मला, विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैत्रीण तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
निळ्याशार सागराला
आपल्या मैत्रीची ओढ वाटावी,
उसळणाऱ्या लाटांना
आपल्या भेटीची आस असावी.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्री म्हणजे अलगद स्पर्श मनाचा,
मैत्री आणि प्रेम म्हणजे अतुट बंध आयुष्याचा.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जीवनात अनेक मैत्रिणी येतात जातात,
पण अशी एक मैत्रीण असते,
जी आपल्या हृदयात घर करून राहिलेली असते,
आणि ती मैत्रीण माझ्यासाठी तूच आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट,
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील,
पण माझ्यासाठी फक्त तू आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत,
नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते,
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत,
जमीन मुळात ओली असावी लागते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सुकलेले फुल सुगंध देऊन जातात,
गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,
प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी,
कोणी मैत्रीत प्रेम तर,
कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
एक प्रेमळ भावनांचा आधार असावा,
दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मित्र तुला मानलय
मैत्रीचा अपमान कधी करू नकोस.
जग फार मोठं आहे
त्यात मित्रांना कधी विसरु नकोस.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्यात जास्त सुख मिळाले तर
वळून बघ मी तुझ्या मागे असेन,
पण दुखामध्ये वळून बघू नकोस
कारण तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्री हि नेहमी गोड असावी,
जीवनात तिला कशाची तोड नसावी,
सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी,
पण आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्यात माझ्या जेव्हा कधी दुःखाची लाट होती,
सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती,
तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्याच्या वाटेवरती
किती मिळती सखे सोबती,
जीवन आपुले सुखी करूया
हात तयांचे घेऊन हाती.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जीवन आहे तिथे आठवण आहे,
आठवण आहे तिथे भावना आहे,
भावना आहे तिथे मैत्री आहे,
आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तुच आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारे,
जुन्या आठवणींना उजाळा देत
गालातल्या गालात हसणारे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपले मनातले वजन कमी
करण्याचे ठिकाण म्हणजे मैत्री,
जे रक्ताचं नसूनही रक्तारक्तात
भिनतं ते नातं म्हणजे मैत्री.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी
मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!