मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे
मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच
ती माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
नाती, प्रेम आणि मैत्री
तर सगळीकडेच असतात,
पण परिपूर्ण तिथेच होतात
जिथे त्यांना आदर मिळतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्री हसवणारी असावी, मैत्री चिडवणारी असावी,
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी,
पण कधीच बदलणारी नसावी.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
निळ्याशार सागराला
आपल्या मैत्रीची ओढ वाटावी,
उसळणाऱ्या लाटांना
आपल्या भेटीची आस असावी.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे,
जीवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे,
जीवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु दे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्री कधी संपत नसते,
आशेविना इच्छा पूरी होत नसते,
तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस,
कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मित्राचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही,
कारण दुःख असो वा सुख
ते आपल्याला एकटे कधीच सोडत नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत,
नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते,
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत,
जमीन मुळात ओली असावी लागते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
काय फरक पडतो
मैत्री जुनी असते की नवी असते,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
मैत्री मात्र हवी असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्री म्हणजे अलगद स्पर्श मनाचा,
मैत्री आणि प्रेम म्हणजे अतुट बंध आयुष्याचा.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जीवनात अनेक मैत्रिणी येतात जातात,
पण अशी एक मैत्रीण असते,
जी आपल्या हृदयात घर करून राहिलेली असते,
आणि ती मैत्रीण माझ्यासाठी तूच आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लिहीताना थरथरले हात माझे
आणि शाईतून तुझं नावच सांडलं,
अक्षरात का होईना
मी मैत्रीला सर्वांपुढे मांडलं.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारे,
जुन्या आठवणींना उजाळा देत
गालातल्या गालात हसणारे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मित्र तुला मानलय
मैत्रीचा अपमान कधी करू नकोस.
जग फार मोठं आहे
त्यात मित्रांना कधी विसरु नकोस.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती मैत्री, आणि फक्त मैत्री.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
विसरु नको तु मला, विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैत्रीण तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट,
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपली मैत्री एक फुल आहे,
ज्याला मी तोडू शकत नाही
आणि सोडू ही शकत नाही,
कारण तोडले तर सुकून जाईल आणि
सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय
जे कधी तिरस्कार करत नाही,
एका गालावरील खळी
जी कधीही रडू देत नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!