आयुष्यात जास्त सुख मिळाले तर
वळून बघ मी तुझ्या मागे असेन,
पण दुखामध्ये वळून बघू नकोस
कारण तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शब्दा पेक्षा सोबतीचे
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जीवन आहे तिथे आठवण आहे,
आठवण आहे तिथे भावना आहे,
भावना आहे तिथे मैत्री आहे,
आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तुच आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्री कधी संपत नसते,
आशेविना इच्छा पूरी होत नसते,
तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस,
कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
निळ्याशार सागराला
आपल्या मैत्रीची ओढ वाटावी,
उसळणाऱ्या लाटांना
आपल्या भेटीची आस असावी.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्री म्हणजे अलगद स्पर्श मनाचा,
मैत्री आणि प्रेम म्हणजे अतुट बंध आयुष्याचा.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील,
पण माझ्यासाठी फक्त तू आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं,
मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं.
पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर,
हे जगणं सोन्याहून पिवळं असतं.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्री मधुन मिळतो,
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
कधी तरी उन्हातुन आल्यावरच कळतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जीवनात अनेक मैत्रिणी येतात जातात,
पण अशी एक मैत्रीण असते,
जी आपल्या हृदयात घर करून राहिलेली असते,
आणि ती मैत्रीण माझ्यासाठी तूच आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत,
नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते,
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत,
जमीन मुळात ओली असावी लागते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपली मैत्री एक फुल आहे,
ज्याला मी तोडू शकत नाही
आणि सोडू ही शकत नाही,
कारण तोडले तर सुकून जाईल आणि
सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी
मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मित्राचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही,
कारण दुःख असो वा सुख
ते आपल्याला एकटे कधीच सोडत नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
विसरु नको तु मला, विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैत्रीण तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्यात माझ्या जेव्हा कधी दुःखाची लाट होती,
सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती,
तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रोजच आठवण यावी असे काही नाही,
रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही,
मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी याला खात्री म्हणतात,
आणि ह्या खात्रीची जाणीव असणे यालाच मैत्री म्हणतात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!