रोजच आठवण यावी असे काही नाही,
रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही,
मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी याला खात्री म्हणतात,
आणि ह्या खात्रीची जाणीव असणे यालाच मैत्री म्हणतात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपले मनातले वजन कमी
करण्याचे ठिकाण म्हणजे मैत्री,
जे रक्ताचं नसूनही रक्तारक्तात
भिनतं ते नातं म्हणजे मैत्री.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मित्राचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही,
कारण दुःख असो वा सुख
ते आपल्याला एकटे कधीच सोडत नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे,
जीवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे,
जीवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु दे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
नाती, प्रेम आणि मैत्री
तर सगळीकडेच असतात,
पण परिपूर्ण तिथेच होतात
जिथे त्यांना आदर मिळतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्यात माझ्या जेव्हा कधी दुःखाची लाट होती,
सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती,
तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत,
नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते,
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत,
जमीन मुळात ओली असावी लागते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्री हसवणारी असावी, मैत्री चिडवणारी असावी,
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी,
पण कधीच बदलणारी नसावी.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैत्री असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्याच्या वाटेवरती
किती मिळती सखे सोबती,
जीवन आपुले सुखी करूया
हात तयांचे घेऊन हाती.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ना सजवायची असते ना गाजवायची असते,
ती तर नुसती रुजवायची असते.
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो
इथे फक्त जीव लावायचा असतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्रीतल्या प्रेमाला कधीच अंत नसतो,
मार्ग कोणताही असू दे
तो जगाहून सुंदर असतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जीवनात अनेक मैत्रिणी येतात जातात,
पण अशी एक मैत्रीण असते,
जी आपल्या हृदयात घर करून राहिलेली असते,
आणि ती मैत्रीण माझ्यासाठी तूच आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
काय फरक पडतो
मैत्री जुनी असते की नवी असते,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
मैत्री मात्र हवी असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मैत्री असावी मुक्त गाणाऱ्या पाखरांसारखी,
मैत्रीचं नातं असतं नाजूक फुलासारखं फुलणारं,
एकदा फुलल्यावर आयुष्यभर गंध देणारं.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लिहीताना थरथरले हात माझे
आणि शाईतून तुझं नावच सांडलं,
अक्षरात का होईना
मी मैत्रीला सर्वांपुढे मांडलं.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!