तुम्ही कितीही मोठे झाला तरीही
असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही,
मोठा माणूस म्हणूनच पाहणार
आणि तो म्हणजे बाबा.
हॅप्पी फादर्स डे!
ध्येय दूर आणि प्रवास खूप आहे
लहानसे आयुष्य आणि काळजी खूप आहे,
छळून टाकले असते या जगाने केव्हाच
परंतु वडिलांच्या प्रेमात ताकत खूप आहे.
हॅप्पी फादर्स डे!
पुस्तके वाचून नाही तर
मी वाटेतील अडथळ्यांकडून शिकलो आहे,
आणि वडिलांमुळेच संकटांमध्ये
मी हसणे शिकलो आहे.
हॅप्पी फादर्स डे!
आईची प्रार्थना प्रत्येक
वाईट नजरेपासून संरक्षण करते,
बाबांची मेहनत मला
काहीतरी करण्याचे धैर्य देते.
हॅप्पी फादर्स डे!
माझ्या चेहऱ्यावरचे हास्य माझ्या बाबांमुळे आहे,
माझ्या डोळ्यातील आनंद माझ्या बाबांमुळे आहे,
माझे बाबा हे देवांपेक्षा कमी नाही,
कारण माझ्या आयुष्यामधला सर्व आनंद बाबांमुळे आहे.
हॅप्पी फादर्स डे!
ज्या दिवशी लोक म्हणतील की
मुलगा पूर्णपणे बापासारखा आहे,
तेव्हा हे शब्दच माझ्या आयुष्यातील
सर्वात मोठी शाबासकी असेल.
हॅप्पी फादर्स डे!
झोप आपली विसरून झोपवले आम्हाला,
अश्रू आपले पाडून हसवले आम्हाला,
कुशीत घेऊन खेळवले आम्हाला,
जीवनातील प्रत्येक सुख दिले वडिलांनी आम्हाला.
हॅप्पी फादर्स डे!
त्याच्या मनाच्या ठायी असलेला मोठेपणा
मला जीवनाचे रहस्य सांगतो,
फार मोठा नाही मला तो
विठ्ठला प्रमाणे भासतो.
हॅप्पी फादर्स डे!
स्वतःची झोप आणि भूक यांचा
विचार न करता आमच्यासाठी झटणारे,
तरीही नेहमी सकारात्मक आणि
प्रसन्न असणारे आमचे बाबा.
हॅप्पी फादर्स डे!
देवकी यशोदेचं प्रेम
जरूर मनात साठवा,
पण भर पावसात टोपलीतून नेणारा
वासुदेवही आठवा.
हॅप्पी फादर्स डे!
नेहमी मला पाठिंबा दिला
आणि दाखवला माझ्यावर विश्वास,
खूप खूप धन्यवाद बाबा
आजचा दिवस आहे खूप खास.
हॅप्पी फादर्स डे!
आयुष्यात सर्वात मोठं सुख
म्हणजे बाबा असणं आणि,
तुम्ही माझे वडील आहात हे
माझं सर्वात मोठं भाग्य आहे.
हॅप्पी फादर्स डे!
तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,
कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार,
माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात
तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे.
हॅप्पी फादर्स डे!
मला सावलीत ठेवले
स्वतः तापले उन्हात,
मी असा एक देवदूत पाहिला
माझ्या बाबांच्या रुपात.
हॅप्पी फादर्स डे!
स्वतः साधा मोबाईल वापरून,
तुम्हाला स्टायलिश मोबाईल घेऊन देतो,
तुमच्या रिचार्ज चे पैसे स्वतःच भरतो,
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तळमळतो,
तो बाप असतो.
हॅप्पी फादर्स डे!
बाप असतो तेल वात
जळत असतो क्षणाक्षणाला,
हाडांची कडे करून
आधार देतो मनामनाला.
हॅप्पी फादर्स डे!
हॅप्पी फादर्स डे!
आयुष्यभर कष्ट करून
जो कायम देतो सदिच्छा,
त्या बाबाला समजून घेऊन
पूर्ण करावी त्याची माफक इच्छा.
हॅप्पी फादर्स डे!
ध्येय दूर आणि प्रवास फार आहे
लहानसे आयुष्य आणि काळजी फार आहे,
मारून टाकले असते या जगाने केव्हाच
परंतु वडिलांच्या प्रेमात ताकत फार आहे.
हॅप्पी फादर्स डे!
बोट धरून आम्हाला चालायला शिकवले
स्वतःची झोप विसरून आम्हाला शांत झोपवले,
परमेश्वरा नेहमी सुखी ठेव माझ्या बाबांना
ज्यांनी अश्रू पुसून आपले आम्हाला हसवले.
हॅप्पी फादर्स डे!
भाग्यवान असतात ती लोक
ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो,
इच्छा पूर्ण होतात सर्व
जर वडील त्याच्याबरोबर असतात.
हॅप्पी फादर्स डे!