Happy Mother's Day 2023 Wishes Images in Marathi - मातृदिनाच्या शुभेच्छा
Share :
पूर्वजन्माची पुण्याई असावी
जो जन्म तुझ्या पोटी घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात
मेतकूट कालवलेला मऊ तूपभात,
आई म्हणजे देव्हाऱ्यातले लक्ष्मीचे चित्र
सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई तुझ्या संस्कारातून
कोवळ्या रुपाचे झाले तरु,
मी कसा गं विसरेन तुला
तुझ्याचमुळे मी झालो यशस्वी.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मन आईचं कधीच कोणाला कळत नाही
ती दूर जाता तिच्यावाचून ही करमत नाही,
काय करु आई आज तुझी खूप आठवण येते
मला प्रत्येक ठिकाणी आज तुझीच सावली दिसते.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जगी माऊलीसारखे कोण आहे
तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे,
असे हे ऋण ज्याचे व्याज नाही
या ऋणाविना जीवनास साज नाही.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे
आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे,
मातृदिनाच्या निमित्ताने फक्त
माझे तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करत आहे.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
दिला जन्म तू विश्व हे दाविलेस
किती कष्ट माये सुखे साहिलेस,
जिण्यालागी आकार माझ्या दिलास,
तुझ्या वंदितो माउली पाऊलांस.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हीच इच्छा माझी की
कितीही वेळा होईल जन्म माझा
तूच हवीस कारण
तू आहेस माझा जन्मोजन्मीचा ठेवा.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आईची ही वेडी माया लावी वेड जीवा
जन्मोजन्मी तुझाच मी व्हावा
माझ्या आयुष्यभराचा हाच खरा ठेवा.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
दु:खात हसवी, सुखात झुलवी
गाऊनी गोड अंगाई,
जगात असे काहीही नाही,
जशी माझी प्रिय आई.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या चुका माफ करून मला योग्य
मार्गदर्शन केल्याबद्दल मी तुझा ऋणी आहे.
या मातृदिनी मी तुला कायम सोबत देईन हे वचन देतो.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी आई.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तू आहेस म्हणून मी आहे
तुझ्याशिवाय माझे अस्तित्व बेकार आहे,
गृहीत तुला धरलं तरी माफ करतेस मला
आहेसच तू मूर्तीमंत देवता.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हजारो फुलं हवीत एक माळ बनवायला
हजारो दिवे हवेत एक आरती सजवायला
हजारो थेंब हवेत एक समुद्र बनायला
पण आई एकटीच पुरे आहे
आपल्या लेकरांचे आयुष्य सावरायला.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचेही ऋण फिटणार नाही,
आई लाख चुका होतील माझ्याकडून
पण तुझं समजावणं कधीच मिटणार नाही.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्याला स्त्री आई म्हणून कळली
तो जिजाऊचा शिवबा झाला.
आई मी भाग्यवान आहे की
मी तुझ्या पोटी जन्म घेतला.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्यामुळे घेतला मी जन्म
पाहिले हे सुंदर जग डोळे भरून,
कसे ऋण फेडू तुझे आई
घेतले मला जिने उदरात सामावून.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रीण असते,
डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते,
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, ती आई असते
खरंच, आई किती वेगळी असते.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मुंबईत घाई, शिर्डीत साई
फूलात जाई, गल्लीगल्लीत भाई
पण जगात भारी केवळ आपली आई.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी
औषधावर दिलेली लिमलेटची गोळी,
आई म्हणजे प्रसादाचा खडीसाखर खडा
शाळेआधी पाटीवर लिहून दिलेला धडा.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्या माऊलीने दिला मला जन्म
जिने गायली अंगाई,
आज मातृदिनाच्या दिवशी
नमन करतो तुजला आई.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
दुःखाचा डोंगर असो की सुखाची बरसात
आठवते ती एकच व्यक्ती कायम जिचा हवा सहवास
अशीच ती आपली आई.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई तुझ्याशी आहे असे अतूट नाते
तू हसल्यावर मीदेखील हसते,
तुला उदास पाहिल्यावर मन माझे रुसते
नेहमी राहा आनंदी, तुझ्यासाठी जिंकेन जग मी.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं,
सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई म्हणजे स्वर्ग
आई म्हणजे सर्व काही,
कितीही जन्म घेतले तरी
तुझे ऋण फेडू शकणार नाही.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!