जगाच्या बाजारात सगळे काही मिळते,
पण आईचे प्रेम काहीही केल्या विकत मिळत नाही.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
दोन शब्दात सारं आकाश सामावून घेई
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई या शब्दात फक्त दोन अक्षरे आहेत,
पण या शब्दात नभाइतके सामर्थ्य आहे.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी कधी बोलत नाही किंवा कधी सांगत नाही,
पण आई तू या जगातील सर्वोत्तम आई आहेस.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आईशिवाय माझे अस्तित्वच नाही
आई असतें जन्माची शिदोरी,
सरत ही नाही आणि उरतही नाही.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हात तुझा मायेचा, असु दे मस्तकावरी,
झेलली आव्हाने सारी, फिरुनी जीवन वारी.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई नावाची वाटते देवालाही नवलाई,
विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वतःला विठाई.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई एक उत्तम शिक्षिका असते.
तीच आपले सर्वस्व घडविते.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या गर्भात नक्कीच स्वर्ग असावा,
म्हणूनच वाटे तुझ्या कुशीत घ्यावा विसावा,
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मायेनं भरलेला कळस म्हणजे आई,
मायेनं विसावा देणारी सावली म्हणजे आई.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
व्यापता न येणारं अस्तित्व,
आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई, आमची सर्वप्रथम गुरु,
तुझ्याचपासून माझे अस्तित्व सुरु.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या आयुष्याचा प्रेमाचा झरा, प्रेरणेचा स्रोत
आणि जगण्याचा मंत्र म्हणजे माझी आई.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आकाशाचा केला कागद समुद्राची केली शाई
तरी आईचा महिमा लिहिता येणार नाही.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
देव जगात सगळीकडे राहू शकत नाही
म्हणून देवाने प्रत्येकाला आई दिली.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कोठेही न मागता भरभरुन मिळालेले दान म्हणजे आई,
विधात्याच्या कृपेचे निर्मळ वरदान म्हणजे आई.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आईचे प्रेम हे कोणत्याही नव्या फुललेल्या
फुलांपेक्षाही अधिक सुगंधित असते.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्यात अनेक जण येतात जातात
पण आईसारखं कधीच कोणी आयुष्यात राहत नाही.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शरीर थकलं तरी मन मात्र थकत नाही,
आई इतकं आपल्यासाठी कोणी सुद्धा झटत नाही.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!