आयुष्यात एवढ मोठ व्हा की तुमचे पाय खेचणारी माणसं उद्या तुमचा हात पकडून तुमच्या बरोबर पुढे जाण्याची इच्छा व्यक्त करतील.
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे, जे तुम्हाला जमणार नाही, असं लोकांना वाटतं, ते साध्य करून दाखवणं.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
आयुष्य खूप लहान आहे, महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नका.
स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.
क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की, यशालाही पर्याय नाही.
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे, जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीवार्द घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.