भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.
आपला वेळ मर्यादित आहे, तो दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात वाया घालवू नका.
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.
जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला, ध्येय नाही.
कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण, बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात.
संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.