आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही.
आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.
एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो, म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
आयुष्यातील अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीत, तर आपल्यात लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी येतात.
आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपं होणार नाही, म्हणून प्रयत्न करत राहा.
भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहात, कारण धनुष्यबाण लांब जाण्यासाठी आधी मागे खेचावा लागतो.