स्वतः ला दिवसेंदिवस अपडेट करणे हाच तर आयुष्य जगण्याचा खरा नियम आहे.
आपला वेळ मर्यादित आहे, तो दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात वाया घालवू नका.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवी संधी आहे.
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण, बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात.
आयुष्यात समोर आलेली आव्हाने जरूर स्वीकारा, कारण त्यातुन तुम्हाला एक तर विजय मिळेल, किंवा पराजयातुन अनुभव मिळेल.
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.
आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा, तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.
आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही.