जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला, ध्येय नाही.
आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.
आयुष्यातील अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीत, तर आपल्यात लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी येतात.
आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.
आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपं होणार नाही, म्हणून प्रयत्न करत राहा.
आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबण्याचं नाही.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
राजासारखे आयुष्य जगण्यासाठी गुलामासारखी मेहनत सुद्धा करावी लागते.