जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे, जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवी संधी आहे.
आयुष्य खूप लहान आहे, महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नका.
आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्याइतके सुंदर काहीच नसते.
आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.
आयुष्यात समोर आलेली आव्हाने जरूर स्वीकारा, कारण त्यातुन तुम्हाला एक तर विजय मिळेल, किंवा पराजयातुन अनुभव मिळेल.
माणसाच्या आयुष्यातील संकटे ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.
आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.