कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे, जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.
आयुष्यात समोर आलेली आव्हाने जरूर स्वीकारा, कारण त्यातुन तुम्हाला एक तर विजय मिळेल, किंवा पराजयातुन अनुभव मिळेल.
आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.
आयुष्यात एवढ मोठ व्हा की तुमचे पाय खेचणारी माणसं उद्या तुमचा हात पकडून तुमच्या बरोबर पुढे जाण्याची इच्छा व्यक्त करतील.
आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा, तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.
आयुष्य खूप लहान आहे, महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नका.
भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.