आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीवार्द घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.
ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय, तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात, एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
राजासारखे आयुष्य जगण्यासाठी गुलामासारखी मेहनत सुद्धा करावी लागते.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे, हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.
आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपं होणार नाही, म्हणून प्रयत्न करत राहा.
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे, जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.