जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.
आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्याइतके सुंदर काहीच नसते.
क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की, यशालाही पर्याय नाही.
राजासारखे आयुष्य जगण्यासाठी गुलामासारखी मेहनत सुद्धा करावी लागते.
संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
आयुष्यातील अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीत, तर आपल्यात लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी येतात.
आपला वेळ मर्यादित आहे, तो दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात वाया घालवू नका.
आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल.