आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या.
माणसाच्या आयुष्याचे रहस्य केवळ जगण्यात नसून कशासाठीतरी जगण्यात आहे.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो.
एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो, म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.
आयुष्यामध्ये नेहमी कमी लोकांनी तुडवलेली वाट निवडा, कमी वेळात यशस्वी व्हाल.
क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की, यशालाही पर्याय नाही.
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे, जे तुम्हाला जमणार नाही, असं लोकांना वाटतं, ते साध्य करून दाखवणं.