तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण, बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात.
आयुष्यामध्ये नेहमी कमी लोकांनी तुडवलेली वाट निवडा, कमी वेळात यशस्वी व्हाल.
आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या.
नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता, मालक व्हायची स्वप्न बघा.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा, तुमचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल.
आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही.
आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्याइतके सुंदर काहीच नसते.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.