आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्याइतके सुंदर काहीच नसते.
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे, जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.
आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपं होणार नाही, म्हणून प्रयत्न करत राहा.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे, हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.
जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला, ध्येय नाही.
माणसाच्या आयुष्याचे रहस्य केवळ जगण्यात नसून कशासाठीतरी जगण्यात आहे.